श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा प्रतिष्ठान, सहकार नगर, पुणे

संकटातून तारत असे।विघ्ने दूर सारत असे।। शेगाविचा गजानन भक्तांवर। नेहमीच माया करत असे।। ।। जय गजानन माऊली ।।

।। श्री गजानन महाराज प्रसन्न ।।
।। गणगण गणात बोते ।।

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते, महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे, त्यांनी भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचता येते हा संदेश दिला आहे.

मंदिर निर्माण कार्याबद्दल

पुणे शहरात काही वर्षापूर्वी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगांव) यांची पालखी कार्तिकी आळंदी वारीसाठी दरवर्षी ३ दिवस शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या विस्तीर्ण मैदानात मुक्कामी येत असे. या सोहळ्यास भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. या पालखीच्या सोहळ्यानिमित्ताने पुण्यनगरीतील काही भक्तांनी दि. २६.१०.१९८८ रोजी श्री गजानन महाराज (शेगांव) सेवा प्रतिष्ठान स्थापन करून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्यनगरीत श्री गजानन महाराजांचा भव्य मंदिराचा दृढ संकल्प करून परमश्रध्देने वाटचाल सुरू केली.

प्रस्तावित सेवा व उपक्रम

मोफत वैद्यकीय सल्ला केंद्र

श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा प्रतिष्ठान, पुणे सहकार नगरातील एक मुफ्त वैद्यकीय तपासणी केंद्राचे स्थापन योजनेत आहे, ज्याच्यात सर्व नागरिकांना मोफत सेवा मिळणार आहे. या स्थापनेच्या अंतर्गत, लोकांच्या सेवेच्या धोरणातून कार्य करण्याचा उद्दिष्ट आहे.

श्री गजानन आरोग्य मंदिर

आम्ही गजानन महाराज (शेगाव) सेवा प्रतिष्ठान मंदिरातून साधकांना एक उपयुक्त आरोग्य मंदिर तयार करण्याचा प्रस्ताव देत आहोत. आम्ही मंदिराच्या साधकांना चांगल्या आरोग्य सल्ला आणि उपचार प्रदान करण्याचा प्रस्ताव केला आहे.

स्त्री शक्ती प्रबोधन व सल्ला केंद्र

आपल्याकडून गजानन महाराज (शेगाव) सेवा प्रतिष्ठान मंदिरात स्त्रियांना एक उपयुक्त स्त्री शक्ती प्रबोधन आणि सल्ला केंद्र स्थापित करण्याचा आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे. 

मोफत बालसंस्कार शिबिर

मंदिरात गेली ३० वर्षे पाच ते पंधरा या वयोगटातील मुलांसाठी मोफत बालसंस्कार शिबिर एक महिना आयोजित केले जाते.त्यात श्लोक, खेळ, अनेकविध कलाकौशल्य, माहितीपर तज्ञांची व्याख्याने व पौष्टिक खाऊ देण्यात येतो. शेवट विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व शालेय साहित्य भेट देऊन केला जातो.

सेवाधारी विश्वस्त मंडळ

श्रीमती पौर्णिमा भारत पवार

अध्यक्ष

श्री. सुधीर बाळकृष्ण पुरंदरे

उपाध्यक्ष

श्री. प्रताप गुलाबराव बाठे

सचिव

श्री.योगेश विजय पावशे

खजिनदार

श्रीमती सुचिता रा. गजेंद्रगडकर

विश्वस्त

श्री. नरेंद्र बाबुराव बाकले

विश्वस्त

श्री. संजय हनुमंत पोमण

विश्वस्त

श्री.अनंत सदाशिव खर्चे

विश्वस्त

श्री. सुभाष मल्लाप्पा जिर्गे

सभासद

अधिक वाचा

मंदिर बद्दल
विश्वस्त मंडळ
संपर्क

ब्लॉग

मंदिर बद्दल